“यंदाची दिवाळी अजित पवार यांना दुर्दैवाने एकट्याला साजरी करावी लागेल अस वाटत आहे; पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबासोबत साजरी करतील अशी अपेक्षा करुयात” अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यानी काल शरद पवार यांची भेट घेतली, त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता त्यावर त्यांनी भूमिका मांडली.