राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांना सदिच्छा दिल्या. यासंदर्भात माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यासह बंगळुरूत झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं.
 
  
  
  
  
  
  
   
   
   
  








 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 




 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  