Girish Mahajan on Kalwa Hospital:ठाणे रुग्णालयातील मृत्यूच्या दुर्घटनेवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती शिवाजी हॉस्पिटल ठाणे येथे १६ लोकांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे. ते मेडिकल कॉलेज आहे जवळपास पाचशे बेड आहे याचं बांधकामही सुरू आहे आणि ते बंद आहे त्यामुळे ते रुग्ण या ठिकाणी येत असतात. त्याचा लोड या कॉलेजवर आहे. मी तेथील आयुक्तांशी बोललो असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत” असं ग्रामविकास मंत्री महाजन म्हणाले.