महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. “संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने आले आहे, ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राला काँग्रेस पक्ष स्थिर सरकार देईल” असा दावाही त्यांनी केला.

















