केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. या प्रश्नी एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती थेट जपानमधून ट्वीटद्वारे दिली. त्यामुळे महायुतीतच श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? असं प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
















