राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी होणं, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच राजकीय खेळी आहे, असा आरोप काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. यावर स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काहीही झालं तरी भाजपाबरोबर जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.