राज्यात झालेल्या राजकीय बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावे,अशी भावना अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावून दाखवत आहेत. त्याचदरम्यान पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटची नियामक मंडळाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार दांडी मारली आहे. मात्र या बैठक ठिकाणाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अजित घुले यांनी ‘लहान तोंडी आज घास मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस…!’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे.