Fadnavis on Women Reservation Bill: ‘अनेक वर्षांपासून…’ ; महिला आरक्षण विधेयकावर फडणवीसांचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. तसेच पंतप्रधान म्हणाले या विधेयकाला आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. या विधेयकामुळे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळत आहे. अनेक वर्षापासून हा प्रयत्न होता. यानिमित्ताने राज्यांच्या विधानसभेत महिलांना निश्चितपणे आरक्षण मिळेल”