लोकसभेत महिला आरक्षण विधेकावर चर्चा केली जात आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधी पक्षातील एका मंत्र्यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा दाखला देत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतलेला. त्यावेळी निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांची आठवण करून देत पलटवार केला.