Bacchu Kadu: “आम्ही बोलणी वगैरे करत नाही” बच्चू कडूंची रोखठोक भूमिका
प्रहार जनशक्ती पक्ष येत्या लोकसभेत अमरावतीची जागा लढवणार, असा दावा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या १५ जागा लढवणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू यांनी दावा केल्यामुळे आगामी काळात खासदार नवनीत राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. धाराशिवमध्ये गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिव्यांग विभागातर्फे दिव्यांगाचा मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे.