मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यांत दौऱ्यावर आहेत. रविवारी (१ ऑक्टोबर) नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा झाली. जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी एकच गर्दी जमली होती. त्यामुळे सभेत काहीसा गोंधळ झाला. त्यावेळी मनोज जरांगे वारंवार नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करत होते. मात्र तरीही गोंधळ सुरुच होता.