मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन आपलं उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, ही मुदत संपत आली तरी अद्याप राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारवर टीका सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला धारेवर धरलं. संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारमधील काही लोक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करत आहेत.



















