आज दसऱ्यानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाकडून मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांची जोरदार तयारी सुरू आहे. मेळावा घेण्याच्या जागेवरून आधी दोन्ही गटात जुंपली होती. आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील एका पोस्टरवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधला आहे. पोस्टरवर असे फोटो छापण्याची हिंमत आम्ही आणि उद्धव ठाकरेंनी देखील केली नाही, असं राऊत म्हणाले.