आज (२० ऑक्टोबर) मराठा समाजाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे समितीने दिलेल्या अहवालानुसार ११ हजार ५३० कुणबी जुन्या नोंदी आढळल्या आहेत. त्यानुसार ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना तत्काळ कुणबी दाखले देण्याची प्रकिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


















