बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादवने नोएडातील एका रेव्ह पार्टीत सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानिमित्त एल्विश यादवला वर्षा निवासस्थानी आमंत्रित करण्यात आला होतं. हाच धागा पकडून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.