दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला होता. दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बाचाबाची तसेच धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.















