Chhagan Bhujbal on Bhide Wada:भिडेवाड्याच्या जागी स्मारक उभारण्याबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासन देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्ताराबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.