बुधवारी (१३ डिसेंबर) दोन तरुणांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात शिरून सुरक्षाभंग केला होता. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रकरणावर संसदेच्या सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी विरोधीपक्षाच्या खासदारांकडून करण्यात आली. यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलंय.










