धारावीतील सर्व रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, धारावीतील ‘टीडीआर’साठी सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन करावी आणि अन्य मागण्यांसाठी ठाकरे गटानं वांद्रे येथील अदाणी कार्यालयावर शनिवारी ( १६ नोव्हेंबर ) मोर्चा काढला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चा शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, मोर्चात महाराष्ट्रभरातून लोक बोलावली होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली होती. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.