आमदार अपात्रता प्रकरण आणि खरी शिवसेना या मुद्द्यांवरून राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी महानिकाल सुनावला. या निकालानुसार, दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवताना खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरवून शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिल्याने ठाकरे गटाने याविरोधात एल्गार पुकारला आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचं विश्लेषण करण्याकरता ठाकरे गटाने आज महापत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकरांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत.















