महाराष्ट्रात जे जे नेते भाजपाच्या विरोधात आहेत त्यांना नोटिसा धाडल्या जात आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे की अफझल खान, शाहिस्तेखान यांचं राज्य आहे ? मोगलाई आली आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे असाही आरोप त्यांनी केला आहे.