राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने मंगळवारी (६ फेब्रुवारी) मोठा निर्णय दिला आहे. अजित पवारांचा गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचं आयोगाने निकालात म्हटलं आहे. शिवाय पक्षचिन्हही अजित पवार गटाला मिळालं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी पक्ष पळवल्याच्या आरोपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.



















