ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घोसाळकर आणि मॉरिस यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले आहेत. वर्षानुवर्ष ते दोघे एकत्र काम करत होते. पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला? मॉरिसने अभिषेक घोसाळकरला गोळ्या का घातल्या? आणि त्यानंतर स्वतःवरही गोळीबार केला. याची चौकशी चालली आहे”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.