काही दिवसांपूर्वीच पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील गुंडांची परेड काढली होती. हाच धागा धरून खासदार संजय राऊतांनी पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत आयुक्तांना जाब विचारला आहे. ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला, त्यांची परेड का नाही केली? हे हल्ले करणाऱ्या राजकीय गुंडांचीही परेड करा, असं म्हणत त्यांनी आयुक्तांना थेट आव्हान दिलं आहे. मुंबईत ते बोलत होते.