‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हे नाव आणि ‘पक्ष चिन्ह’ अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचा नामफलक तोडला होता. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत वैयक्तिक लक्ष घालावे, असे साकडे खुद्द शरद पवार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समक्ष भेट घेत घातले. पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली.त्यावेळी प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन तक्रार केली.













