‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत मला व्यक्तिश: आवडते. ते नसते तर मी भाजपाला मतदानही केले नसते. मोदी यांचा दृष्टिकोन मला आवडतो. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. मात्र मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते’, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते पीयूष मिश्रा यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.



















