भाजपाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. भाजपा महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मुद्दामहून खच्चीकरण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही तोफ डागली आहे.
 
  
  
  
  
  
  
   
   
   
  








 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 


 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  