वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकल्यानंतर पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. वसंत मोरे यांना वेगवेगळ्या पक्षाकडून ऑफर दिल्या जात आहेत. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरेंच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनीदेखील त्यांची भेट घेत पक्षात येण्याचं आवाहन केलं आहे.