रविंद्र धंगेकरांनी गिरीश बापटांचा फोटो वापरला, मात्र मला असं वाटतं गिरीश बापट त्या फोटोतून सांगत असणार याला मतदान करू नका, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी केली. त्या टीकेला काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ती पोस्ट मी टाकलेली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी ती पोस्ट टाकली त्यांना मी धन्यवाद देतो. गिरीश बापट हे लोकनेते होते. लोकशाहीत कुठलाही नेता एका चौकटीत राहिला नाही पाहिजे. त्यांनीही लोकनेते होण्याचा प्रयत्न करावा, असं म्हणत धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.