एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार आहेत. त्यासाठी येत्या १५ दिवसांत आपला पक्षप्रवेश करावा, अशी विनंती त्यांनी दिल्लीतील वरिष्ठांना केल्याची माहिती दिली. या संदर्भात आज पत्रकारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारले त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथजी मोठे नेते आहेत. त्यांना घ्यायचं की नाही हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातातलं काम नाही, असा मिश्कील टोला गिरीश महाजन यांनी लगावला.