बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि क्रिती सेनॉन यांनी काल (१४ एप्रिल) वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी वाराणसीच्या नयनरम्य घाटांचा आणि तिथल्या निसर्गसौंदऱ्याचा आनंद घेतला. दरम्यान, एएनआयशी बोलताना रणवीर म्हणाला, “मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाहीये. मी भगवान शंकराचा भक्त असून इथे पहिल्यांदाच आलो आहे. आपली संस्कृती आपण साजरी केली पाहिजे, हेच पंतप्रधान मोदींचं स्वप्न होतं” अशाच प्रकारे क्रिती सेनॉनही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.









