लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंडमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही तरी बाहेरची म्हणाल का? तुम्हाला पटतय का? निवडणुकीचं बोला , विकासाचं बोला. घरातली व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर मुलाच्या हातात धंदा देते, तसंच आता आमच्या हातात द्या” असं विधान केलं.