पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी झाले. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांनी जवळपास ५० दिवसांहून अधिक काळ शहराच्या अनेक भागात जाऊन प्रचार सभा, रॅली, पदयात्रा काढत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यानंतर ‘वाडेश्वर कट्ट्या’वर प्रतिक्रिया देताना धंगेकरांनी निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया दिली.
  
  
  
  










 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



