ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदानानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी देखील केल्या आहेत. अनेक मतदान केद्रांवर अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.