लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भाजपाप्रणीत एनडीएला २९२ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा भाजपाने गाठला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे.