भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झाला. पंकजा यांच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली. बीडमध्ये फटका बसल्यानंतर पंकजा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांचे आभार मानण्यासाठी त्या बीडला जाणार आहेत.














