मराठा आरक्षणाचा पेच अद्याप कायम आहे. आरक्षणावरून ओबीसी समाजही आता आक्रमक झाला आहे. त्यावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहे. त्यांच्याकडे असून ते एवढे लढत असतील. तर यापुढे आम्ही किती ताकदीने लढतो बघा. तसंच मराठा आरक्षणाला सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी पाठिंबा द्यावा अन्यथा दारात उभं करणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  