१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदनपर भाषणं केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या पाहा.













