एकीकडे दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू असून या महिन्याच्या शेवटी देशाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, दुसरीकडे नुकत्याच निवडून संसदेत गेलेल्या महाराष्ट्रातील काही खासदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली.
 
   
   
   
  








 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 


 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  