मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे मिहीर शाह नावाच्या तरुणाने वेगात कार चालवत दोघांना धडक दिली. या घटनेत कावेरी नाखवा नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांची वर्षा गायकवाड यांनी भेट घेतली. यावेळी प्रदीप नाखवा यांनी घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 










