निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर आता राम कदम यांनी टीका केली आहे. “मी दिल्ली पुढे कधीही झुकणार नाही, असं म्हणणारे आज दिल्लीत काय फेरफटका मारायला गेलेत?”,असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.



















