उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही पुण्याच्या मावळमध्ये पोहोचली. तळेगाव या ठिकाणी अजित पवार यांची भव्य सभा झाली. सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या तरुणाने ‘अजित दादा’ पुन्हा राष्ट्रवादीत पक्षात या अशी भावनिक साद थेट अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच घातली. यामुळे सर्वांचं लक्ष त्या राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याकडे वेधलं गेलं होतं.