CM Mazi Ladki Bahin Scheme Explained: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता सरकारकडून रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 1st Installment) रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत शासनाकडून राज्यातील तब्बल 80 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये मानधन त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात आले आहे. पण यातून लाखो महिलांना अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही त्यामागे तीन महत्त्वाची कारणे असू शकतात.