अविवाहित तरुणांना हेरुन लग्नाचा बनाव रचणाऱ्या टोळीला धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने धुळे शहरातील एका तरुणाला ३ लाखांचा गंडा घातला होता. अटक केल्यानंतर या टोळीच्या हातात पोलिसांनी काही फलक दिले. ज्यावर बनावट आई,बनावट भाऊ, बनावट मामा असं लिहिलं होतं.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  