महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडत आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल, असं सांगितले होतं.











