लाडकी बहीण योजनेचा निधी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, शिवसेनेतील बंडखोरी हे मुद्दे सध्या निवडणुकीच्या निमित्ताने बरेच चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या विषयांवर आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
















