वरळीतील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारार्थ आज राज ठाकेर यांची वरळीत जाहीर सभा होती. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या स्थापनेवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. तसंच आपल्याला एकदा संधी द्या, असं आवाहनही त्यांनी वरळीकरांना केलं.













