भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्याला विरोधकांनी त्रास दिल्याने लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिली आहे. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. विरोधकांनी हे न थांबवल्यास वीस तारखेच्या नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. माझ्या शांततेचा अंत पाहू नका. असा इशारा विरोधकांना महेश लांडगे यांनी दिला आहे. महेश लांडगे हे संतापले होते. राजकारण हा माझा पिंड नाही. हे देखील विरोधकांनी लक्षात ठेवावं. असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना एक प्रकारे तंबी दिली आहे. महेश लांडगे हे दिघी मध्ये जाहीर सभेत बोलत होते. यावेळी आमदार पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.