राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मविआच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली. तसेच अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.



















