Kalyan Child Rescued From Broken Grill: कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात शनी मंदिराजवळील चंद्रकिरण सोसायटीत एका घरात तिसऱ्या माळ्यावर लोखंडी जाळी लावलेल्या खिडकीत खेळताना सात वर्षाचे बालक जाळीत पडले. तकलादू झालेली लोखंडी जाळी बालकासह तुटली. त्या बरोबर बालक जाळीतून बाहेर पडून इमारतीबाहेरील अधांतरी सज्ज्यावर अडकले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शिडीच्या वाहनाने बाळाला सुखरूप वाचविले.